महिला रूग्णालय ,स्वस्तिक रुग्णालय व स्टेडियममधील क्रीडा संकुलनातील बालरुग्ण कोव्हीड केअर सेंटरचे न‍ामदार उदय सामंत यांच्या हस्ते उद्या लोकार्पण

रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालय रत्नागिरी येथील बालरुग्ण कोव्हीड कक्ष व PSA ऑक्सिजन जनरेशन प्लान्टचे लोकार्पण दु.३:३०वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम, मारुती मंदीर रत्नागिरी येथील बालरुग्ण कोव्हीडकेअर सेंटर व दु. ४:१५ वाजता स्वस्तिक बालरुग्ण समर्पित कोव्हीड रुग्णालयाचा लोकार्पण
सोहळा मा.ना.उदय रविंद्र सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्तेसंपन्न होणार आहे.
महिला रुग्णालय रत्नागिरी येथील बालरुग्ण कोव्हीड कक्षामध्ये १४ ऑक्सिजन सपोर्टेडबेड्स उपलब्ध असणार आहेत. तसेच स्वस्तिक बालरुग्ण समर्पित कोव्हीड रुग्णालयामध्ये ४०ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स असून ५ व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध आहेत तर छत्रपती शिवाजी
महाराज स्टेडिअम मारुती मंदीर रत्नागिरी येथे सुरु करणेत येणा-या बालरुग्ण कोव्हीड केअरसेंटर येथे कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असणा-या बालरुग्णांवर उपचार करणेत येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button