
संगमेश्वर तालुक्यातील करंजारी येथे घरफोडी; १२ लाखाचा ऐवज लंपास…
संगमेश्वर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीचे सत्र सुरूच आहे. करंजारी येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी १२ लाखाचा ऐवज लंपास केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर मंगळवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मधुसुदन शिवराम भुर्के यांनी फिर्याद दिली. भुर्के हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दिवाळी सुट्टीनिमित्त सर्वजण बाहेरगावी गेले होते. भुर्के कुटुंबिय मंगळवारी
पुन्हा घरी आले असता चारी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बंगल्याचा मागील दरवाजा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारून दागिने लंपास केल्याचे भुर्के यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
www.konkantoday.com



