आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न पदवी पुरस्कार “जाहीर….. कारकिर्दीतील सहावा पुरस्कार…


भारताची ,महाराष्ट्राची स्टार आंतरराष्ट्रीय कॅरमपटू व महाराष्ट्र शासनाचा मानाचा मा.शिवछत्रपती पुरस्कार मिळालेली देवडे गावची सुकन्या, कॅरमक्वीन आकांक्षा उदय कदम हिला स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे. आकांक्षा हिचा कारकिर्दीतील हा सहावा पुरस्कार आहे. आकांक्षा ही अवघी 20 वर्षीय स्टार खेळाडू आहे
अजूनपर्यंत आकांक्षाने कॅरम या खेळात राष्ट्रीय शालेय कँरम स्पर्धेत 1 सुवर्ण 2 रौप्य पदके मिळाली आहेत.तीने सलग तीन वेळा ज्युनिअर राज्यस्तरीय गटाचे विजेतेपदक मिळवून हँटरिक केली आहे.. तिला राज्यस्तरावरील महिलांच्या एकेरी ओपन गटाचे तब्बल 13 वेळा विजेतेपद मिळविलेले असून एक वेळ हँटरिकही आकांक्षाच्या नावे आहे….आकांक्षाने अजूनपर्यंत विविध स्तरावर 36 सुवर्णपदके…13 रौप्यपदके…व 13 ब्रांझ पदके अशी एकूण 62 पदके मिळविली आहेत..त्यामधील 4 सुवर्णपदके व 1 रौप्यपदके अशी एकुण 5 पदके ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. तीला 4 सुवर्णपदके व 2 रौप्यपदके ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली आहेत.
आकांक्षाला अजूनपर्यंत राणी लक्ष्मीबाई शौर्य पुरस्कार…तरुण भारत सन्मान पुरस्कार..राष्ट्रीय विश्वसमता क्रिडापुरस्कार मिळालेला आहे. नुकताच मला महाराष्ट्र शासनाचा सन 2023/2024 चा मानाचा मा.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मा. राज्यपाल महोदय, मा. मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे शुभहस्ते बालेवाडी पुणे येथे प्रधान करण्यात आलेला आहे.तसेच सन 2024/2025 या वर्षीचा रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत दिला जाणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार (गुणवंत खेळाडू ) हा महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब यांचे शुभहस्ते दिनांक 15/08/2025 रोजी प्रदान करण्यात आलेला आहे.
सदर पुरस्कार 13 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत पत्रकार भवन आझाद मैदान शेजारी मुंबई येथे संस्थापक मा.संजय कोकरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार सचिन कळझुनकर सर तसेच मा.धनंजय कुवेसकर साहेब,मा.सुखदेव पवार साहेब व इतर मान्यवरांचे शुभहस्ते आकांक्षाला प्रधान करण्यात येणार आहे.
वयाच्या नऊ वर्षांपासून कॅरम खेळत असलेल्या आकांक्षाला तिचा मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, मामा महेश देवरुखकर,भाऊ यश कदम महाराष्ट्र कॅरम असोसिएशन चे मानद सचिव केदार सर, यतीन ठाकूर सर, अजित सावंत सर, रत्नागिरी जिल्हा कॅरमचे भाटकर सर, साप्ते सर, नितीन लिमयें सर व सर्व कॅरमचे पदाधिकारी व खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले.
आकांक्षा हिला इंडियन ऑइल कंपनीकडून स्कॉलरशिप मिळाली असून ती आता सुरु असलेल्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्रा कडून खेळत आहे. तीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button