
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय संकल्प दिवस आणि राष्ट्रीय एकता दिवस साजरा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथि राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी श्रीमती इंदिरा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर उपस्थित सर्वानी ‘राष्ट्रीय एकता दिवस शपथ’ घेतली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.




