महायुतीच्या प्रचारार्थ कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर खेड नगरपालिका जिल्हा रत्नागिरी येथे दाखल


राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असल्याने खेड नगरपालिका जिल्हा रत्नागिरी येथे कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरिता खेड नगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली.


या निमित्ताने शिवसेनेचे नेते मा. रामदास कदम साहेब, गृहराज्यमंत्री मा. योगेश कदम साहेब, भारतीय जनता पार्टीचे वैभव खेडेकर साहेब यांची भेट घेतली, खेड तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधव यांची भेट घेऊन निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले.


त्याचबरोबर महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. माधवीताई बुटाला, नगरसेवक पदाचे उमेदवार रहीम युसुफ सहिबोल, सौ. दीप्ती शिगवण, भूषण शांताराम चिखले, रसिका राकेश खेडेकर, सुनील दरेकर, नीता आंब्रे, स्वप्नील सौतवडेकर, स्वप्नाली चव्हाण या उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार केला महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन नागरिकांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button