
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावर्डे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

आबलोली (संदेश कदम) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावर्डे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण काल (२४ ऑक्टोबर) शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील संघटनात्मक कार्यासाठी मार्गदर्शन केले. सावर्डेत नव्याने उभारलेल्या या कार्यालयातून पक्ष संघटन अधिक बळकट होऊन जनसेवेचे नवे अध्याय सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, उपतालुकाप्रमुख संदीप राणे, सचिन शेट्ये, राजाभाऊ नारकर, चिपळूण शहरप्रमुख भैया कदम, सावर्डे विभागप्रमुख सागर सावंत, मांडकी विभागप्रमुख रमेश कुंभार, असुर्डे विभागप्रमुख अजित गुजर, माजी जि.प. सदस्य संतोष चव्हाण, माजी पं.स. सदस्य सुभाष जाधव, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, क्षेत्राध्यक्षा रुमा देवळेकर, शहर सचिव प्रशांत मुळ्ये तसेच ज्येष्ठ शिवसैनिक बाळशेठ पंडित, सुशील सावंत, सुनील जाधव, संजय कोकाटे, बावाशेठ राजेशिर्के, अकलाख शेख, राजू गुरव, बाबुदा गुडेकर, दत्ता उदेग, सुनील गुरव, विष्णू चव्हाण, सुरेश वाघे, फैसल कास्कर, प्रसिद्धी प्रमुख सचिन चोरगे, यांच्यासह युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, तालुका संघटिका मानसी भोसले, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवतीसेना प्रमुख शिवानी कासार, उपविभाग प्रमुख रमेश राजेशिर्के, संदीप चव्हाण, फैय्याज शिरळकर, शाखाप्रमुख सुभाष राडे, विवेक सुर्वे, नयन कुळे, कृष्णा (नाना) हुमणे, तेजस घाणेकर, नीलेश डिके, अमोल पिरधनकर, रूपेश घाग, मयूर घाग, शशी राणीम, नीलेश भुवड, युवसेना विभाग प्रमुख भूपेश सावर्डेकर, नवनियुक्त विभाग प्रमुख धनराज वरेकर, युवासेना विभाग अधिकारी विशाल परकर, खामकर, बारकू बुआ, दिलीप घाग, बाबू भुवड, यांच्यासह अनेक मान्यवर व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सावर्डे विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.




