
माजी मुख्यमंत्री रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांचा जनता दरबार..
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायणराव राणे साहेब यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. जनता दरबाराचे आयोजन हे तीन टप्प्यात असणार आहे. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार साहेब यांनी विशेष प्रयत्न करावे यासाठी या जनता दरबारचे आयोजन आहे. नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
खासदार नारायणराव राणे साहेब यांचा जनता दरबार २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दु. ०२ वाजता चिपळूण येथील सहकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारामध्ये चिपळूण तालुक्यातील प्रश्न घेऊन नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे. तर २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. देवरुख संगमेश्वर येथे मराठा हॉल भाजपा तालुका कार्यालयजवळ देवरुख येथे संगमेश्वर तालुक्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.
तर २९ ऑक्टोबर रोजी ११ वाजता डी.पी.डी.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.




