चिपळूण शहरात माहेरच्या रामजन्मोत्सवात रमल्या सुमित्रा महाजन

जानेवारीमध्ये अयोध्येत श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले आणि त्यानंतर आज मला माझ्या माहेरच्या घरी येवून माझ्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित राहता आले असे दुहेरी भाग्य आज मला लाभले. बालपणापासून पाहिलेला हा उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा होत आहे. याचा मला आनंद असल्याच सांगत माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या बुधवारी माहेरच्या श्री रामनवमी उत्सवात रमल्या.शिरळ-मालघरच्या श्री लक्ष्मी केशव देवस्थानच्या मालघर येथील श्री राम मंदिरात मंगळवारी गुढीपाडव्यापासून श्रीराम नवमी जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. दीडशे वर्षांचे मंदिर आणि ११२४ वर्षांची रामनवमी उत्सवाची परंपरा असलेल्या या मंदिरात प्रतिपदा म्हणजेच पाडवा ते चैत्र शुद्ध दशमी या कालावधीत होणार्‍या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबधील शिरळ हे सुमित्राताई यांचे माहेर आहे. त्या येथे येण्यास नेहमीच उत्सुक असतात. बुधवारी रामनवमी उत्सवानिमित्त आलेल्या सुमित्राताईंनी दुपारच्या रामजन्मोत्सव सोहळ्यात भाग घेतला. त्यानंतर झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात त्यांना वयोवृध्द असलेल्या भाग्यश्री साठे यांच्या हस्ते साडीचोळी भेट देण्यात आली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button