
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या मिशन सेरेब्रल पाल्सी उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या मिशन सेरेब्रल पाल्सी या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. सहाय्यक उपकरणे, फिजिओथेरपी, शस्त्रक्रिया सहाय्य, पुनर्वसन केंद्रांची उभारणी या माध्यमातून या भागातील शेकडो कुटुंबांना आशा, मदत आणि चांगल्या जीवनाची दिशा मिळाली आहे. पुढील काही वर्षांत रत्नागिरीतील अधिक तालुक्यांमध्ये विस्तारीत करण्यात येणार आहेत. तसेच डिजिटल व घरगुती थेरपीसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने रत्नागिरी आणि सातारा जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने, सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांना सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी २०१५ पासून अथक परिश्रम घेतले आहेत. सातारा जिल्ह्यातील यशस्वी सेरेब्रल पाल्सी कॅम्पनंतर, फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने रत्नागिरीमध्येही सलग दहा वर्षे हा उपक्रम यशस्वी केला आहे. २०१५ मध्ये एका साध्या व्हिलचेअर वाटप उपक्रमापासून ही वाटचाल सुरू झाली.
सध्या रत्नागिरीत सेरेब्रल पाल्सीग्रस्त रुग्णांसाठी शिबीर सुरू आहे. यात संचेती हॉस्पीटल, भारती हॉस्पीटल, केईएम हॉस्पीटल, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल आणि वालावलकर हॉस्पीटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स वैद्यकीय आणि थेरपी मूल्यांकन करत आहेत. कुटुंबांना घरगुती उपचार, पोषण आणि दीर्घकालीन पुनर्वसन याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. मिशन सेरेब्रल पाल्सी उपक्रमाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. याबद्दल फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकूल माधव फाऊंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुकही त्यांनी केले.www.konkantoday.com




