
गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने १३७.६९ कोटी रुपयांचा मिळविला नफा
कोकण रेल्वेने बुधवारी ३५व्या स्थापना दिन साजरा केला. या कार्यक्रमात आर्थिक वर्षातील प्रगतीचा उहापोह केला. याचवेळी नवीन केआरसीएल मोबाईल ऍपचेही लॉचिंग करण्यात आले. आर्थिक वर्षात केआरसीएलने १३७.६९ कोटी रुपयांचा नफा मिळवत नवीन प्रकल्पांमध्ये महामंडळाने ४,१५७ कोटी किंमतीचे नवीन प्रकल्प सुरक्षित केले. यामध्ये विद्युतीकरणाच्या कामांसाठी ३ हजार कोटींचा समावेश आहे. अनक्कम्पोइल-कल्लाडी-मेप्पाडी बोगदा रस्ता प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली असून त्याला एलओए जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे केरळ सरकारने विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणीसाठी १,४८२,९२ कोटींचा डीपीआर मंजूर केला असून ओडिशा, गुजरात आणि राजस्थान येथे नवीन रेल्वे मार्गावर काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवात चालवण्यात आलेल्या विक्रमी ३८१ विशेष गाड्यांमधून ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांना पूरक प्रमाणात सुविधा देण्यासाठी आर्थिक वर्षात १८.६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यांत आल्याची माहिती देण्यात आली. पुढील ३ वर्षात प्रवासी सुविधांसाठी १०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात मडगाव येथे नवीन पादचारी पूल व स्थानकांवर रेल्वे आर्केडचे उद्घाटन या प्रमुख सुधारणांचा समावेश आहे. स्थानक सुशोभिकरण, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागासोबत झालेल्या सामंजस्य करारांतर्गत १२ स्थानकांवर दर्शनी भागाचे सुशोभिकरण झाल्याची माहिती देण्यात आली.www.konkantoday.com




