वाटूळ येथील रॅलीस paramedical institute मध्ये डॉ A.P.J. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन .


रॅलीस paramedical institute
वाटूळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती व भारत रत्न डॉ् A. P. J. अब्दुल कलाम यांच्या जंयतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला राजापुर पोलीस ठाण्याच्या API दीपलक्ष्मी पाटील मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनान करून करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते DMLT कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधुन यशस्वी झालेल्या वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक अजिंक्य मेस्त्री द्वितीय क्रमांक मानसी गाढे. त्रितिय क्रमांक देवेश लांबोरे, तर क्राफ्ट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ग्रुप किर्ती सुतार आणि तृप्ती नवळू , द्वितीय क्रमांक ग्रुप सकिना नाईक आणी तन्वी सावंत तृतीय क्रमांक सायली वाजे या विद्यार्थ्यांचे पुष्प व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस API दीपलक्ष्मी पाटील मॅडम यांनी DMLT च्य विद्यार्थ्याना मोबाईल चे दुष्परिणाम काय काय होतात व त्यासाठी काय काय करावे याची माहिती दिली.तर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी सायबर क्राईम कसे घडले घडले जातात. व ते घडू नये यासाठी काय काय काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदरशन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोबिण शेख, रॅलीस फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अण्णा पवार सर, वाटूळ ग्रामपंचायत सदस्य दादा (प्रशांत चव्हाण) चव्हाण, आणि विध्या विकास मंडळ चे सेक्रेटरी विजय चव्हाण आणि आदर्श विद्यामंदिर चे शिक्षक वर्ग शेवटी अंजली पवार मॅडम यांनी सगळ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button