भरणे येथे ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी


खेड : भरणे येथील श्री काशीमठासमोर दुचाकीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार दि. 13 रोजी झालेल्या या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक भरणे काशीमठ समोरील दुभाजक पार करून खेडच्या दिशेने वळत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवर स्वार एक महिला व पुरुष दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी 108 व शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button