
गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले कृषी मंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
गोव्याचे दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले कृषी मंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.रवि नाईक यांनी ७९ व्या अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली. रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवि नाईक यांच्या निधानानंतर श्रध्दांजली अर्पण केली. रवी नाईक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.
रवी नाईक यांना बुधवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना घरातून तात्काळ पोंडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारावेळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रवी नाईक यांचे पार्थिव पोंडा येथील निवासस्थानी हलविण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन देण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. नाईक यांच्या जाण्याने गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहेत.




