
जिल्हास्तरीय युवा महोत्सव सहभागासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करा
रत्नागिरी, दि. १३ ):- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन २८ ते २९ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींनी तसेच युवा मंडळांनी २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी पुढील गुगल लिंकवर करावी. (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf८LZPcKJ2XPMhZhoBZ७२eQyMBTag4QAMyaLsoeMо-SZK७raQ/viewform?usp=header) अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन) असे उपक्रम आहेत. दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत करण्यात येते. सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक चे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.




