
ठाकरे शिवसेनेतर्फे हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी उद्या निदर्शने
रत्नागिरी : सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी या मागणीसाठी उद्या (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी नुकसान भरपाई व कर्जमाफीसाठी निदर्शने करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसीलदार कार्यालय येथे शेतकरी बांधव, शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसहकार सेना, रिक्षासेना व इतर अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी शासनाला हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई व कर्जमाफी करण्यासाठी निदर्शने करून भाग पाडले पाहिजे.
यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले आहे.




