
शासनाच्या योजनची व नगर परिषद उपक्रमांची माहिती आता नगरपालिकेत ’स्क्रिन’ वर
चिपळूण नगर परिषद राबवत असलेले उपक्रम, शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी कार्यालयात एलईडी टिव्ही बसवण्यात आला आहे. त्याच्या स्क्रिनवर योजनांची माहिती मिळणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक नगर परिषदेत येतात. अनेकदा मला भेटण्यासाठी त्यांना काहीवेळ बाहेर बसावे लागते. अशा वेळेत त्यांना नगर परिषद राबवत असलेले उपक्रम समजावेत, त्यात त्यांना काय योगदान देता येईल, याचा त्यांनी विचार करावा यासाठी दालनाबाहेर हा टिव्ही लावण्यात आला आहे. सध्या त्यावर उपक्रमांची माहिती, फोटो दाखवले जात आहेत. तर नजीकच्या काळात नागरिकांसाठी असणार्या शासनाच्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याची माहिती दाखवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले. यावेळी कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, सचिन शिंदे, संतोष शिंदे, वलीद वांगडे, सुशांत मोहिते आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com




