राष्ट्रवादीचे काम हे सर्वांपेक्षा अधिक वेगाने आहे. जर हाच वेग कायम ठेवला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा मतदारसंघात फडकेल – जयंत पाटील

केंद्रसरकारचे काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे… महागाई वाढत आहे. लोकांना याबाबतीत प्रबोधन करा… सरकारची चुकीची बाजू लोकांना दाखवा… बुथ कमिट्या या पक्षाचा बुरुज आहे… हा बुरुज मजबूत ठेवा… राष्ट्रवादी काँग्रेसचे काम हे सर्वांपेक्षा अधिक वेगाने आहे. जर हाच वेग कायम ठेवला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या मतदारसंघात फडकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांना बोलता यावं आणि त्यांच्या भावना लक्षात याव्यात यासाठी ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आहे असेही जयंत पाटील यांनी सांगताना आपल्याला कार्यकारिणीचा विस्तार आपण करायला हवा. बुथवर वेगवेगळी टीम न करता एकच टीम कार्यरत रहावी हा प्रयत्न करा. या मतदारसंघात आपली ताकद निर्माण करण्यासाठी तळागाळात काम करा असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.
आता आगामी काळात अनेक निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि इथले संघटन मजबूत करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
लोकसभेचा प्रतिनिधी किती वेगाने काम करू शकतो याचे उदाहरण खासदार सुनील तटकरे यांनी दाखवले आहे. जेटी, बंदरे असतील, इथला सीआरझेडचा प्रश्न असेल यासाठी पाठपुरावा करून, हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम फक्त एक जागृत लोकप्रतिनिधी करू शकतो. सुनील तटकरे यांचा पाच वर्षांच्या काळात आपल्याला लक्षात येईल की मागच्या कालखंडात जे इतर खासदार करू शकले नाही ते काम त्यांनी केले आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी स्तुती केली.
९९ साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा इथे शिवसेनेची पकड मोठ्या प्रमाणात होती. मोठा संघर्ष इथे होत होता मात्र आपण इथे चांगलं काम केलं आणि राष्ट्रवादीने इथे जागा बनवली. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. लोकांच्या समस्या जाणून घेऊन मनात स्थान निर्माण केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या भागात फडकला असे खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
२०१४ साली प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी आपल्याला इथे पराभव स्विकारावा लागला मात्र २०१९ ला आपण सर्व कमतरता भरून काढल्या आणि विजय संपादित केला असेही खासदार सुनिल तटकरे स्पष्ट केले.
आज परिस्थिती वेगळी आहे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजितदादा, जयंत पाटील हे सरकारचे नेतृत्व करत आहे. कोविड असेल, महापूर असेल या संकटाच्या काळात सरकार चांगले काम करत आहे. आदरणीय पवारसाहेबांनी या भागात दौरा केला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना फोन केला तेव्हा तात्काळ सरकारतर्फे पॅकेजी घोषणा केली गेली असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
या भागात महाविकास आघाडीचा धर्म लक्षात घेता मित्र पक्षाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पूर्णपणे करत आहे आणि पुढेही करत राहील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार शिखर निकम, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक बबन कनावजे, महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण, युवक अध्यक्ष योगेश शिर्के, युवती अध्यक्षा दिशा दाभोळकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button