
आमदार भास्करशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेर्डीमध्ये प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात जनआक्रोश मोर्चाने परिसर दणाणला
महावितरणचे जुने बीज मीटर बदलून एका जन्तीमार्फत नवीन प्रीपेड वीज मीटर बसण्याचा सपाटा सर्वत्र सुरू आहे. चिपळूण तालुक्यातून या प्रक्रियेला प्रचंड नरोध होत आहे. परंतु त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत प्रीपेड मीटर बसवत आहेत, त्यामुळे विजेचे बिल दुप्पट व तिन्चट येत असल्याने नागरिकांची मोठी ओरड होत आहे. त्याची डेडर्डी आणि पेढे जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी बांनी पुढाकार घेत जनआक्रोश मोर्चाची हाक दिली होती, मंगळवारी जनआक्रोश मोर्चा थेट खेडी येथील महावितरण कार्यालयावर धडकला. या मोर्चात शिवसेना उबाता गटाचे नेते, आमदार भास्करशेठ जाधत हे देखिल सहभागी झाले होते.
मोर्चा खेर्डी महावितरण कार्यालयासमोर पोहोचताच जोरदार घोषणाबाजी झाली. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिकाल्यांना निवेदन दिले. यापुढे प्रीपेड मीटर बसवू नयेत, जबरदस्तीने लावलेले प्रीपेड मीटर तातडीने काढून टाकावेत, बंद घरांमध्ये बेकायदेशीरसीत्या बसवलेले मीटर हटवावेत, अशा ठाम मागण्या केल्या. या वेळी आक्रमक झालेल्या आ. जाधव यांनी अधिकार्यांवर प्रश्नांचा भडीमार करत रोखठोक भूमिका मांडली.
या वेळी शिवसेना उबाठा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, उबाठा शहराध्यक्ष सचिन उर्फ़ भैया कदम, आदी उपस्थित होते.www.konkantoday.com




