चिपळूण नगर परिषदेच्या पथकाकडून तपासणी

चिपळूण : नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या  फटाके व दिवाळीच्या अन्य साहित्य विक्री स्टॉल्सची तपासणी केली. न. प. कडून तसेच महसूल, पोलिस प्रशासनाकडून संबंधितांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही याचीही तपासणी करण्यात आली.
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात दिवाळीचे साहित्य व फटाके विक्री करणारे तात्पुरते स्टॉल उभे करण्यात आले आहेत. अनेक स्टॉल रस्त्यानजिकच असल्याने त्याला वाहतुकीचा मोठा अडथळा होत आहे. फटाके विक्री करताना महसूल, पोलिस, नगरपालिका आदी विभागांकडून आवश्यक ते परवाने घेणे गरजेचे आहे. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, असे सुरक्षेचे उपाय करून विक्री स्टॉल उभारणे गरजेचे आहे. न. प. प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणी उभारलेल्या फटाके व दिवाळी साहित्य विक्री स्टॉल्सची अतिक्रमण विरोधी पथकाने तपासणी करून संबंधितांना सुरक्षा, वाहतूक कोंडीबाबत सूचना देऊन परवाने तपासण्यात आले. यावेळी न. प. चे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, परेश पवार, श्रीनिवास जोशी, पोलिस कर्मचारी व अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी यांनी पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button