
‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धा ७ व ८ ऑक्टोबर रोजी
महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन...
रत्नागिरी : ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या वर्षी अभिमानाचे आणि प्रगतीचे असे ‘साठावे वर्ष’ साजरे करीत आहे. कोकणातील महाविद्यालयांमधील रंगकर्मीसाठी रत्नागिरी केंद्रावर गेली १२ वर्ष, ‘पुरुषोत्तम करंडक महाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी (वर्ष १३ वे) ही स्पर्धा दिनांक ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम करंडक वेळापत्रक असे (महाविद्यालय आणि एकांकिकेचे नाव) : सकाळी ११ वाजता भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय – पैठणी. दुपारी १२ वाजता फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी – तुकारामाची टोपी. दुपारी २ वाजता सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च- विनाअनुदानित. दुपारी ३ वाजता मत्स्य महाविद्यालय शिरगाव – जाळ्यातिल खिळे. सायंकाळी ४ वाजता फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी – ठोंग्या. सायंकाळी ५ वाजता उद्यानविद्या महाविद्यालय दापोली- श्यामची आई. सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड (जि. रायगड)- काहीतरी अडकलंय.
करंडक महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित, ‘पुरुषोत्तम महाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेच्या या गौरवशाली वर्षामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा आणि अधिक माहितीसाठी संदीप जोशी (९६७३६३३४१८) किंवा सौ. गौरी महाजन (७०५७७३८०३३) यांच्याशी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




