
नापत्ता व्यक्तींबाबत पोलीसांचे निवेदन
रत्नागिरी, दि. 3 ) : जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून काही नागरिक नापत्ता झाल्याची माहिती पुढे येत आहे. तरी नापत्ता झालेल्या व्यक्तींविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पांडूरंग गुणाजी दरडे वय ८० वर्षे, रा. आडवली, टाकेवाडी, ता. लांजा या दि. 25 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 4 च्या सुमारात आडवली, टाकेवाडी, ता. लांजा येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंचरी 5 फुट, रंग काळा सावळा, नेसणीस फिक्कट रंगाची फुल पँट व सफेद लायनींगचे शर्ट, पायात चप्पल, डोक्यात पांढऱ्या रंगाची टोपी, हातात घड्याळ घातलेला आहे.
श्रीमती. सिताबाई रामचंद्र गुरव वय ७५ वर्षे रा. वनगुळे गुरववाडी ता. लांजा येथून 26 सप्टेंबर 2017 रोजी 8 वाजता नापत्ता झाल्या आहेत. त्या घरातून गावातील ठाकराचा माळ येथे शेतात जाते असे सांगून निघाल्या, त्या परत आल्याच नाही, नापत्ता झाल्या आहेत. त्यांनी नेसणीस नऊवारी गुलाबी रंगाची साडी, अंगात गुलाबी रंगाचा ब्लाऊज, रंग निमगोरा, कसे पिकलेले, हातात साध्या पितळेच्या बांगड्या,गळ्यात साधे धातुची माळ व हातात लाल रंगाची पिशवी आहे.
श्रीमती नम्रता नारायण कुवार वय ४५ वर्षे रा. हर्चे उभावाडा ता.लांजा येथील राहणाऱ्या असून दि. 30 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारात लांजा गोंडेसखल रोडजवळील कोत्रे हॉटेल समोरून ता.लांजा येथून नापत्ता झालया आहेत. शिक्षण नाही, उंची ४ फुट ४ इंच, रंग सावळा, केस काळे व कुरळे, नाक थोडे चपटे, गळयात (खोटे) लहान व मोठो मंगळसुत्र, नेसणीस फिक्कट लाल रंगाची साडी व ब्लाउज, पायात पिवळसर रंगाची चप्पल, हातात काचेच्या व सोनेरी रंगाच्या बांगडया, पान सुपारी खाण्याची सवय, डावे हातावर कावीळचा जुना डाग, दोन्ही कानाच्या पाळया फाटलेल्या, सोबत काळया रंगाची सॅक असे आहे.
सवाई तनेराजसिह भाटी, वय वर्षे ३८ राहणार बईया तहसिल फतेहगड जि. जैसलमेर पोस्ट ठाणे जिंझनियाली राज्य राजस्थान येथला असून दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे 5.45 वाजता निवसर रेल्वे स्टेशन येथून नापत्ता झाला आहे. त्याची उंची ५ फुट ९ इंच, रंग निमगोरा, डोळे भुरे, केस काळे, नाक सरळ, अंगात टी शर्ट व जिन्स पॅन्ट आहे.
000




