
संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्य बिबट्याचा मुक्त संचाराने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण
संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्य बिबट्याचा सातत्याने वावर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राणी आता मानवी वस्त्यांमध्ये मुक्तपणे फिरू लागले असून पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत
संगमेश्वर शहर व परिसरात नर-मादी बिबटे त्यांच्या बछड्यांसह खुलेआम फिरत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मौजे असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बछड्याचा मृत्यू झाला होता.www.konkantoday.com




