
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे आजारपणाला कंटाळून वृद्धाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. शिवाजी दामा माचिवले (७०, तरवळ माचिवलेवाडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. शिवाजी हे मागील अनेक वर्षापासून मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने आजारी होते.
www.konkantoday.com




