
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द
रत्नागिरी, दि. 30 : राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. १ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000




