गणपतीपुळे एमटीडीसी येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बोट क्लब प्रचलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी दि. ३१ :- एमटीडीसी, गणपतीपुळे, रत्नागिरी येथे आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत यांच्या हस्ते बोट क्लब प्रचलन शुभारंभ करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, गणपतीपुळे गावच्या सरपंच कल्पना पकये, मुख्य प्रशिक्षक व महाव्यवस्थापक सारंग कुलकणी, रत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी आदि मान्यवर तसेच पर्यटक उपस्थित होते.
याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हयात पर्यटन वाढीसाठी असे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकामध्ये वाढ होऊन येथील स्थानिक तरुणांनाही उद्योग व रोजगार उपलब्ध होतील.
www.konkantodaycom

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button