
वेळणेश्वर येथे दुर्गादेवीचा नवरात्रौत्सव ५ दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होणार
श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर या मंडळाचा स्तुत्य उपक्रम
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. वामन काका जोशी यांच्या भव्य पटांगणात वेळणेश्वर बाजारपेठ येथे दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार होणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी दुपारी श्री दुर्गादेवी मातेचे मिरवणुकीने आगमन झाले. आज (२९ सप्टेंबर) सकाळी श्री दुर्गादेवी मातेची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यानंतर पूजा व आरती कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्री माऊली महिला भजन मंडळ जानवळे मंडळाच्या बुवा सौ. जान्हवी विखारे यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता महाआरती आणि ९.३० वाजता फनी गेम्सचे आयोजन केले आहे. उद्या (३० सप्टेंबर) सकाळी ७ वाजता रत्नागिरी येथील श्री नवलाई महिला भजन मंडळ, नाचणे मंडळाच्या बुवा सौ. सर्वथा चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ हेदवी यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. आरती झाल्यानंतर ९.३० वाजता फनी गेम्स होतील. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता श्री दुर्गादेवी मातेची पूजा व आरती होईल. सायंकाळी ७ वाजता गुहागर खालचापाट येथील स्वर साधना भजन मंडळ बुवा आदिती धनावडे यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता महाआरती घेण्यात येणार आहे. रात्री ९.३० वाजता शारदादेवी नृत्य कलापथक असगोली वरचीवाडी शक्तीवाले शाहीर प्रमोद घुमे यांच्या विरुद्ध मुंढर येथील तुरेवाले शाहीर विनोद गावडे सह दिनेश सुतार यांचा जबरदस्त डबलबारी नाचाचा सामना होईल.
२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता श्री दुर्गादेवी मातेची पूजा, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता हळदीकुंकू कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता महाआरती होणार असून १० वाजता दांडिया रास खेळण्यात येणार असून लहान गटात, मोठ्या गटात खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता दुर्गादेवी मातेची पूजा त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती घेण्यात येणार असून सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीने श्री दुर्गादेवी मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे.
भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर व ग्रामस्थ मंडळ वेळणेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




