
दापोली शहरात उनाड गुरांमुळे दुकानदार व वाहनचालक हैराण, खाद्यपदार्थ आणि वाहनांचे नुकसान
दापोली शहराला सध्या विविध समस्यांनी ग्रासले असतानाच शहरामध्ये उनाड गुरांची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून यातील काही गुरे हे दुकानदारांच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तूंचा नाश करतात. तसेच दुचाकीस्वारांनी दुचाकीला लावलेल्या पिशव्या ओढून दुचाकीचे तसेच खाद्यपदार्थांचे नुकसान करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दापोली शहरातील प्रमुख रस्त्यांवर के ळसकर नाका, उपजिल्हा रुग्णालयासमोर, दाभोळ मार्गावर, बुरोंडी नाका, राधाकृष्ण मंदिरासमोर अशा विविध ठिकाणी उनाड गुरे दिवसभर बसलेली असतात. त्यामध्ये गाई, बैल, वासरांचा समावेश आहे. काही गुरांचे मालक हे ही गुरे दूध काढण्यासाठी घेऊन जातात, व त्यानंतर पुन्हा रस्त्यावर मोडन देतात. ही गुरे दिवसभर दापोली शहरातील विविध नागामध्ये फिरत असतात.www.konkantoday.com




