
रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक,आज तीन पक्षाचे उमेदवार आपला अर्ज दाखल करणार
रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २९ डिसेंबर रोजी मतदान होत आहे.आज १२ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन,राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कीर तसेच मनसेचे रुपेश सावंत हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या अगोदर शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे ही निवडणूक आता चौरंगी होणार असे दिसत आहे.
www.konkantoday.com




