
भारत-पाकिस्तान फायनलला अवघे काही तास शिल्लक असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा दणका, सर्व लाईव्ह शो रद्द!
आशिया कपमध्ये आज रात्री आठ वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल होणार आहे. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केलाय. मात्र, PVR मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा लाईव्ह शो दाखवण्यात येणार होता.संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, ‘हा तर नीच पणाचा कळस, PVR मधील” पी ” म्हणजे पाकिस्तान आहे काय? हे पीव्हीआर वाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत. यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्ल्लजपणा येतो कोठून?’
‘सोनम वांगचुक यांना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक केली,आता त्याच आरोपाखाली या हरामखोर पीव्हीआर वाल्याना अटक करा, फडणवीस आहे एवढी हिम्मत?’, असा सवाल देखील त्यांनी विचारला.भारत पाकिस्तान सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे, पहाणे, हा पहलगाम मधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे. देशद्रोह आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही. पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे.’, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला.संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर अवघ्या काही वेळातच PVR ने भारत-पाकिस्तान फायनचे सर्व लाईव्ह शो रद्द करत असल्याचे जाहीर केले. त्या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या ट्विटवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ट्विट रिट्विट करत शिवसेनेचा ठाकरी दणका महाराष्ट्रात PVR चित्रपटगृहातून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाणार नाही, असे सांगितले.




