टीडब्ल्यूजेच्या कंपनीच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल झाल्याने  ठेवीदारांच्यात भीतीचे वातावरण, चिपळुणातील कार्यालय दोन महिन्यांपासून बंद


गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्‍या टीडब्ल्यूजे कंपनीचे मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकरसह त्याची पत्नी व प्रतिनिधी अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवलेले पैसे मिळणार की बुडणार या विवंचनेत नागरिक सापडले असताना शहरातील पागमळा येथे असलेले टीडब्ल्यूजेचे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, नार्वेकर दांपत्यावर गुन्हा दाखल होताच गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर, संचालक नेहा समीर नार्वेकर (दोघे गुहागर), प्रतिनिधी संकेश रामकृष्ण घाग (चिपळूण), सिद्धेश शिवाजी कदम (कामथे) यांच्यावर फसणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतातील मच्छीमारांना मासेमारी करताना पाकिस्तान श्रीलंकेच्या सागरी हद्दीत गेल्याप्रकरणी पकडण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. या भारतीय मच्छीमारांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी श्रीलंकेत झालेल्या ग्लोबल फोरमच्या सभेत केली. तसेच भारतीय मच्छीमारांच्या इतरही समस्याही त्यांनी मांडल्या.
श्रीलंका स्टिअरिंग कमिटी फॉर न्येलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती फॉर फूड सोव्हरिन्टी यांच्या ग्लोबल फोरममध्ये रामकृष्ण तांडेल यांना परिषद श्रीलंका कँडी येथील नॅशनल इंन्स्टिट्यूट फॉर को-ऑप. डेव्हलपमेंट येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत जगभरातील शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी, मजूर आदी संघटनांचे नेते, अन्न सार्वभौमत्वाचे पुरस्कर्ते, नागरी समाजातील कार्यकर्ते आणि धोरण निर्माते सहभागी झाले होते. अनंतकाळ मासेमारी व्यवसाय टिकावा व पारंपरिक मच्छीमारांचा उदरनिर्वाह अबाधित रहावा, टिकाऊ शेती, अन्न उत्पादकांचे हक्क या महत्वाच्या विषयावर संवाद होऊन धोरणात्मक निर्णय यावर चर्चा करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button