
इंडिगो कर्मचाऱ्यांच्या समस्यांची ना. उदय सामंत ह्यांनी घेतली तत्काळ दखल!
मुंबई विमानतळावरील T1 टर्मिनलवर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि समस्यांबाबत आज मुंबई एअरपोर्ट एव्हिएशन असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची विमानतळावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
ना. उदय सामंत ह्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई आणि दिल्ली येथील संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधल्याने समस्यांवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा ठाम शब्द यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिला.
या प्रसंगी वांद्रे विभाग प्रमुख व राष्ट्रीय कामगार सेनेचे राज्य सचिव श्री. कुणाल सरमळकर यांनी केलेल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या प्रसंगी एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइज असोसिएशनचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद, टॅक्सी संघटनेचे सदस्य तसेच वांद्रे परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




