
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही- उद्योगमंत्री उदय सामंत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे ठाम आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.मराठा समाजाला मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. कोणत्याही समाजाच्या तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार सर्व समाजांना न्याय देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.




