
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्याखासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा

रत्नागिरी, दि. 22 :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द वाहन क्रमांक व प्रवासाच्या तपशीलासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी dyrto.08-mh@gov.in अथवा 8275101779 या कार्यालयाच्या व्हॉटसअप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.


जिल्हयातील प्रवाशी रिक्षांच्या मनमानी भाडे आकारणी बाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडेदर तक्ता (मीटरप्रमाणे व शेअर रिक्षा) हा जिल्हयातील विविध रिक्षा थांब्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर 27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित केले आहेत.




