आंबोलीची विशेष ओळख सांगणारा ‘बुश फ्रॉग’


पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मुख्य हॉट स्पॉट असलेल्या आंबोली परिसरात दुर्मीळ व अतिदुर्मीळ वन्यजीव, वनस्पती दिसून येतात. या परिसरात सापडणार्‍या उडत्या बेडका (मलबार ग्लायडिंग फ्रॉग) सह आंबोली टोड नंतर सर्वात आकर्षण आणि महत्वाचा तिसरा बेडूक म्हणजेच आंबोली बुश फ्रॉग आंबोली बुश फ्रॉग याचे शास्त्रीय नाव ‘स्यूडोफिलाटस अंबोली’ ( असे आहे.स्युडो म्हणजे खोटे किंवा फसवे आणि फिलाऊट म्हणजे मोहक. हे नाव या बेडकांचे वेगळे आणि काहीसे मोहक वैशिष्ट्य सांगते. दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात आंबोली परिसरात वन्यजीव, वनस्पती, कीटक आदींचा नव्या प्रजातीचा शोध लागतो. शास्त्रज्ञांनी 2006 साली आंबोलीच्या जंगलातून ही प्रजाती शोधली. ही प्रजाती पश्चिम घाटामध्ये आढळणारी एक दमीर्र्ळ आणि प्रदेशनिष्ठ बेडूक प्रजाती आहे. ही प्रजाती महाराष्ट्रातील आंबोली, आंबाघाट तसेच कर्नाटकातील कॅसल रॉक, लोंडा, जोग फॉल्स, माविनगुंडी, कुद्रेमुख, मल्लेश्वरम आणि गोव्याजवळील कोटीगाव या परिसरात आढळते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button