
चिपळूण शहराच्या समस्या सोडविण्यासाठी आ. शेखर निकम यांनी घेतला पुढाकार
दिवसेंदिवस वीज समस्या वाढत चाललेली असून यामुळे नागरिक, व्यापार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे याची दखल घेत आमदार शेखर निकम यानी समस्येतून मार्ग काढण्यासाठी महावितरण, नगर परिषदेचे अधिकारी, व्यापारी आणि नागरिकांची महत्वपूर्ण बैठक १५ रोजी दुपारी २.३० वाजता नगर परिषदेजवळील सावरकर सभागृहात आयोजित केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. व्यापारी, नागरिकांनी या संदर्भात अनेकवेळा महावितरणकडे तक्रारी केल्या. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी महावितरणच्या विरोधात सर्वत्र असंतोष पसरत चालला आहे. त्यामुळे याबाबत आमदार निकम यांनीच पुढाकार घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत शहरातील व्यापारी, नागरिक यांची संयुक्त बैठक घेतली आहे. आमदार निकम हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. नगर परिषद मुख्याधिकार्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, महावितणसंदर्भात कुणाच्या तक्रारी असतील तर त्या बापू काणे यांच्या डायनिंग हॉल येथे १३ सप्टेंबरपर्यंत पोहोच कराव्यात, तसेच बैठकीलाही उपस्थित रहावे, असे आवाहन व्यापारी संघटनेचे सचिव उदय ओतारी यांनी केले आहे.
www.konkantoday.com




