
आकर्षक समुद्रकिनारा असलेल्या दापोलीतील मुरूड समुद्रकिनारी वाहून आलेल्या कचर्याचे संकट
दापोली समुद्र किनार्याच्या सौदर्यांमुळे पर्यटकांची गर्दी खेचणार्या दापोलीतील नव्या पर्यटन हंगामास पुढील आठवड्यात प्रारंभहोणार आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनाही याची उत्सुकता लागली आहे. मात्र येऊ घातलेल्या नव्या पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी वाहून आलेल्या कचर्याचे संकट उभे राहिले आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत कोकणात मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेक रिसॉर्ट बंद होते. मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे व शाळांना सुट्या पडल्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिकांना पर्यटकांचे वेध लागले आहे. शिवाय
दसर्यापासून कोकणात नव्या वर्षाच्या पर्यटन हंगामाला सुरुवात होते. मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने व समुद्राला आलेल्या उधाणाने मोठ्या प्रमाणात कचरा मुरुड समुद्रकिनारी पसरला आहे. दापोलीत येणारा पर्यटक राहण्यासाठी समुद्रकिनारी असणार्या गावांना प्रथम पसंती देतो. मात्र आता हा वाहून आलेला कचरा पर्यटकांकरिता अडसर ठरणार आहे. तसेच या कचर्यामुळे किनाण्यांचे विद्रुपीकरणही होत आहे. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामाच्या अगोदर संबंधित प्रशासनाने या कचर्याची विल्हेवाट लावण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे.
www.konkantoday.com




