
रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांची आरोग्यसेवेच्या उपसंचालकपदी पदोन्नती
रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांची आरोग्यसेवेच्या उपसंचालकपदी पदोन्नती झाली आहे.त्यांची बदली या पदावर मुंबईला झाली आहे. डॉ. आठल्ये हे गेली चार वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. आठल्ये लवकरच उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्यकेंद्र, उपकेंद्राची समस्या जाणून घेत त्या सोडवण्यात डॉ. आठल्ये यांनी विशेष पुढाकार घेतला.