
आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नातून खरवतेत साकारतेय आधुनिक क्रीडांगण
सह्याद्री शिक्षण संस्था व आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून खरवते कृषी महाविद्यालयाच्या परिसरात १३ एकर जागेत आधुनिक क्रीडांगणाची उभारणी सुरू झाली आहे. या क्रीडांगणामुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना खेळातील प्रावीण्य सिद्ध करण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या क्रीडांगणात अत्याधुनिक इनडोअर क्रीडांगण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ४ क्रिकेट विकेट्स व मैदान, आधुनिक बास्केटबॉल कोर्ट, सुव्यवस्थित व्हॉलिबॉल मैदान, बंदिस्त कबड्डी मैदान, तसेच सेमी ऑलिंपिक साईजचा जलतरण तलाव उभारला जात आहे. लवकरच या सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामीण तरुणाईला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची नवी संधी मिळणार आहे. या क्रीडांगणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.www.konkantoday.com