
रत्नागिरी शहरातील तेलीआळी लाल गणपती परिसरातील रस्त्यांवर ढेकणे परिवाराकडून पेवर ब्लॉक बसविले
रत्नागिरी शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध लाल गणपती जवळील बाहेरील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी स्वखर्चातून पेवर ब्लॉक बसवून दिले. या उपक्रमामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना सोयीस्कर व सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे. तेली आळी परिसरात जाणारा हा मुख्य रस्ता या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता परिसरातील लोक त्रस्त होते. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये अमित विलणकर, सचिन गांधी, सौ अश्विनी गांधी संतोष रेडीज, उदय बसणकर, बाळा नाचणकर, शिवलकर सर, सुरेंद्र लांजेकर, किरण कदम, प्रवीण ढेकणे, सौ समीक्षा पाडाळकर, अनिकेत शेट्ये, गोविंद भन्सारी, समीर वस्ता, संकेत भोंगले, बाळा आजगेकर, कमलाकर जोशी व मुकेश माळी चंपालाल माळी संदीप रेडीज मगन सोळंकी आदींचा उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करून ढेकणे दाम्पत्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.




