
कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये आढळले ४ बांगलादेशी
कोकण मार्गावरून धावणार्या सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये ४ बांगलादेशी आढळले. हे चौघेही विनातिकीट प्रवास करत असल्याची बाब काही जागरुक प्रवाशांच्या निदर्शनास आली. यातील एकाच्या बॅगेमध्ये चाकू देखील आढळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या चारही बांगलादेशी प्रवाशांना येथील स्थानकात उतरवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
www.konkantoday.com