न्याहारी निवास योजनेतून पर्यटक नक्की कोकणात राहतील -आमदार प्रसाद लाड

रत्नागिरी च्या सर्वांगीण विकासा साठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावे दत्तक घेऊन त्यातील 500 घरांमध्ये न्याहारी निवास योजना आखली. त्यासाठी तिनही जिल्हा बॅंकाच्या अध्यक्षांशी चर्चा करून 100 कोटी रुपये देण्याचे ठरले. या योजनेतून पर्यटक नक्की कोकणात राहतील, जास्तीत जास्त पर्यटन उद्योजकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन आमदार तथा भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले.या वेळी खासदार मनोज कोटक म्हणाले, एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे या वेळी “हिरवळ’ संस्थेचे किशोर धारिया, मिनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, उल्का विश्‍वासराव, जि. प. सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, ऍड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर,मकरंद केसरकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button