
कोकण रेल्वेची पहिली ‘रो-रो कार’ सेवा प्रवाशांना घेऊन दाखल
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली रो-रो कार सेवा शनिवारी रात्री 11.30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्थानकात दाखल झाली. या रो-रो सेवेमधून जिल्ह्यातील चार मुंबईकर आपल्या कारमधून कुटुंबीयांसोबत दाखल झाले.कोकण रेल्वे प्रवासी संघ व कोकण रेल्वेकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या सेवेचे प्रारंभिक स्थानक असलेल्या रायगड-कोलाड स्थानकात शनिवारी दु. 3 वा. या सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. वाघेरीचे माजी सरपंच संतोष राणे, पियाळीतील सामाजिक कार्यकर्ते बाबू घाडी, नांदगाव स्टेशन मास्तर मधुकर मातोंडकर व प्रवासी उपस्थित होते.