
राजापूर शहर तसेच तालुक्यात रस्त्यावर फिरणार्या मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडीयम बेल्ट
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाविक, वाहनांची वर्दळ वाढते. या काळात रस्त्यावरून जाणार्या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. अनेकवेळा गुरे अचानक रस्त्यात आल्याने वाहनधारकांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात घडतात. याची दखल घेत यंदा विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल राजापूरच्यावतीने एक अभिनव व उपयुक्त असा उपक्रम राबवण्यात आला. शहर व परिसरातील मोकाट गुरांच्या गळ्यांत रेडियमचे बेल्ट बांधून त्यांची व वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाचे संयोजन बजरंग दलाचे संयोजक निकेश पांचाळ यांनी केले असून सहसंयोजक म्हणून संदीप मसूरकर यांनी काम पाहिले. गोरक्षा प्रमुख अभिषेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमावेळी विकास वर्मा, नीतेश मसूरकर, तन्मय शिवलकर, आदित्य शिवलकर, ऋषी म्हादये, सर्वेश लिंगायत, प्रीतम कांजर, योगेश नाचणेकर, र, अक्षय अक्षय घुमे, मार्गेश कदम, संकेत व कार्यकर्ते उपस्थित होते. रेडियम बेल्ट बांधल्यामुळे रात्रीच्या वेळीही रस्त्यावरून जाणारी गुरे वाहनचालकांना दूरवरूनच स्पष्ट दिसतील. यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल, असे निकेश पांचाळ यांनी सांगितले.www.konkantoday.com