
परदेशातून येणार्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाकडून सक्त नजर
रत्नागिरी जिल्ह्यात १०० बेड या आजाराच्या पार्श्वभूमीवर तयार ठेवण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयासह परकार, लोटलीकर, चिरायु, चिंतामणी आणि डेरवण हॉस्पिटल यासाठी सहकार्य करणार आहे. याशिवाय गर्दी नसलेल्या ठिकाणीही नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. जनजागृतीसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यासाठी ०२३५२-२२६२४८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले.
www.konkantoday.com




