
टोलमुक्तीचा पास दाखवूनही आला फास्टॅगमधून पैसे कापल्याचा मेसेज, शासनाची चाकरमान्यांसाठी टोल मुक्तीची घोषणा फसवी,?
राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोलमुक्तीची घोषणा केली खरी पण शनिवारी कोकणाकडे निघालेल्या अनेक गणेश भक्तांनी टोल पास दाखवल्यानंतरही त्यांच्या फास्टॅगमधून टोलचे पैसे वजा झाल्याची घटना घडत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत काहींनी फास्टॅग काढून ठेवले तरीही त्यांच्या त्या खात्यातून पैसे कोकणवासीय प्रचंड संतापले आहेत. सरकारची ही टोलमाफी फसवी असल्याचे या मार्गावरून कोकणात येणाऱ्या शुभांगी कदम, या प्रवाशांनी सांगितले
यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत टोलमाफी जाहीर केली. मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६६) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांवरील टोल नाक्यांवर भाविकांना शुल्क भरावे लागणार नाही, असे जाहीर केले.
टोल माफीसाठी ‘गणेशोत्सव २०२५’, ‘कोकण दर्शन’ असे पास जारी केले. या पासवर वाहन क्रमांक व मालकाचे नाव यांसह प्रवासाचा तपशील नमूद करून ते वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिले जात आहेत. शासनाच्या आदेशानुसार हे पास दाखवल्यास दोन्ही प्रवासासाठी टोलमुक्ती लागू होणार आहे. असे सांगण्यात आले होते
फास्टॅग काढून ठेवला तरीही पडला भुर्दंड फसवणुकीची भावना
शनिवारपासून कोकणात जाणाऱ्या भक्तांनी टोलनाक्यावर पास दाखविल्यानंतरही फास्टॅगमधून टोलचे पैसे कापले गेले. काहींनी खबरदारी म्हणून फास्टॅग काढून ठेवला. त्यांना टोलची रक्कम फास्टॅग बॅलन्समधून कापल्याचा मेसेज आला. त्यामुळे सरकारची टोलमुक्ती फसवी असल्याची भावना कोकणवासीयांनी व्यक्त केली.