
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण ठेवलेले ५० लाखांचे सोने गायब, शाखाधिकारी, कॅशियर व शिपायाविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सोने तारण कर्ज प्रकरणे केली जातात. ग्राहकांकडून सोने घेऊन त्या बदल्यात कर्ज वाटप करण्यात आले होते. तारण ठेवलेले सोने बँकेच्या तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला येथील शाखेचे शाखाधिकारी किरण बारये, कॅशियर ओंकार कोळवणकर व शिपाई अमोल मोहिते यांनी एका ग्राहकाने तारणापोटी बँकेच्या तिजोरीत सोने तारण ठेवलेल्या पिशव्यांमधील ५०४.३४ ग्रॅम वजनाचे सुमारे ५० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने आपल्या फायद्यासाठी काढून घेतले व बँकेची फसवणूक केली.
दरम्यान ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर बैंककडून त्यांचे दागिने परत केले जाणार होते. मात्र तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर येताच वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांनी तपास करून वरील तिघा आरोपींविरूद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.www.konkantoday.com