
परशुराम घाटातील भिंत कोसळण्याच्या स्थितीत आणखी एक कॉंक्रीटची भिंत कोसळण्याची शक्यता
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या गॅबियन भिंती मुसळधार पावसात ढासळल्यानंतर आता आणखी एक पंधरा फूट उंचीची कॉंक्रीटची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे.
चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यातील कंत्राटदार कंपनीमध्ये विभागल्या गेलेल्या या घाटात आहे. बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती कोसळत गेल्याने आजतागायत हा घाट चर्चेत राहिला आहे. अखेर टेहरी या संस्थेने घाटाचा अभ्यास करून सुचविलेल्या उपाययोजनेनुसार डोंगराला लोखंडी जाळी आणि गॅबियन वॉलची उभारणी सुरू केली. मात्र यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने कामे अर्धवट राहिली आणि त्यातूनच गॅबियन वॉलचे बांधकाम कोसळले. महामार्गाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या भिंतीच्या खालून नवीन गॅबियन भिंतीची उभारणी केली जाणार आहे.www.konkantoday.com