पहिलीतील मुलींशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिस कोठडी

रत्नागिरी : तालुक्यातील पाली नजिकच्या एका गावातील प्राथमिक शाळेत पहिलीतील चिमुरड्या मुलींशी अश्लिल चाळे करणार्‍या शिक्षकाला ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी 1 दिवसाच्या पोलिस कोठडीत केली. रमेश जाधव (50, रा.संगमेश्वर, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी पालकांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली हाेती तक्रार दिल्यावर ग्रामीण पोलिसांनी शिक्षकाला शनिवारी रात्री अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button