
रत्नागिरी जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ५४ जणांची उपोषणे, आंदोलने
प्रशासन आणि शासकीय यंत्रणांकडून आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी उपोषण आणि आंदोलन करणार्यांची संख्या जास्त असते. ७९ व्या स्वातंत्र्यदिनी जिल्हाभरातून ५४ जणांनी आमरण उपोषण तसेच आत्मदहनासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यातून सर्वाधिक १३ जणांनी आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यदिन तसेच प्रजासत्ताक दिनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर आपले गार्हाणे मांडण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कांसाठी नागरिक उपोषण तसेच आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. शुक्रवारी होण्या स्वातंत्र्यदिनीही जिल्ह्यातून ५४ जणांनी आत्मदहन तसेच उपोषणाचा इशारा दिला आहे. यामध्ये सर्वाधिक उपोषण करणार्यांची संख्या खेड तालुक्यातील आहे. तर मंडणगड तालुक्यातून फक्त एका महिलेने आपले चोरी झालेले दागिने ७ वर्षानंतरही पोलिसांना सापडत नसल्याबाबत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातून ११, लांजा येथून ५ तर राजापूर आणि गुहागर तालुक्यातून २, गुहागरमधून २, दापोली तालुक्यातून ३, चिपळूण तालुक्यातून १० जणांनी आंदोलन आणि उपोषणाचा अर्ज दाखल झाले आहेत.
www.konkantoday.com




