
महामार्गावरील गलथान कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते राहुल गुरव यांच बेमुदत उपोषण
मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या कामांतील गंभीर त्रुटींविरोधात संगमेश्वर नाका येथे सामाजिक कार्यकर्ते राहुल गुरव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महामार्गाव जागोजागी खड्डे, नुकत्याच पूर्ण झालेल्या कॉंक्रिट रस्त्यांना पडलेले तडे, अपूर्ण आणि असुरक्षित संरक्षक भिंती, तसेच शाळकरी मुलांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेड्सची झालेली दुरवस्था या सर्व मुद्द्यांकडे संबंधित प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हे संविधानिक आंदोलन सुरू केले आहे.
राहुल गुरव यांनी आपल्या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाच्या गलथान कारभाराची पोलखोल केली असून, कामे सुरू करण्याआधी नियोजनाचा अभाव व नंतर देखरेखीतील निष्काळजीपणा यामुळे स्थानिक जनतेच्या सरक्षिततेशी खेल बालला आहे, असे ते म्हणाले. स्थानिक जनता देखिल मोठ्या प्रमाणावर या आंदोलनास पाठिंबा देत आहे. संगमेश्वरवासीयांनी उपोषणस्थळी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेडकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी जानी उपोषणस्थळी येऊन राहुल गुरव यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.
www.konkantoday.com